शीश पाल

गेल्या वीस वर्षांपासून शीश पाल भारत ज्ञानविज्ञान समितीच्या जीवनशाळा कार्यक्रमाशी निगडित आहेत.
पानीपत जिल्ह्यातील पर्यायी शिक्षणाच्या जीवन-शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची मुलांशी जवळीक निर्माण झाली. इथेच त्यांना बाल-साहित्याच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली.
सध्या ते राज्य संसाधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रूम टू रीड इंडियासाठी अनेक चित्रपुस्तकांचे लिखाण केले आहे.