शर्मिला देव

शर्मिला देव

शर्मिला देव यांना कायमच वन्यजीवनाचं आकर्षण होतं आणि त्या निसर्गप्रेमी आहेत.
मुलांना वनस्पती आणि प्राणी जगताची ओळख करून द्यायला त्यांना आवडतं. त्या आणि त्यांचे पती मुलांच्या गटांना रात्रभराच्या शिबिरांनी घेऊन जातात. त्यांनी तीन पुस्तकाचं सहलेखन केलेलं असून, नियतकालिकं आणि वृत्तपत्रांसाठी अनेक लेख आणि कथा लिहिल्या आहेत.
चालणं, डुलकी काढणं आणि आपल्या मुलांना स्वयंपाकाला लावणं, यातून उरलेल्या वेळात त्या कल्पवृक्ष आणि परिसर या दोन सामाजिक संस्थांसाठी काम करतात.
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातल्या चार आश्रमशाळांमध्ये त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या शिक्षणाचे उपक्रम सुरू केले आहेत आणि लडाखमधील एका उपक्रमाला मदत केली आहे.