ऋचा नामजोशी

ऋचा नामजोशी या कॉमर्स पदवीधर असून टॅक्सेशन लॉ आणि सीए इंटर या परीक्षादेखील उत्तीर्ण झाल्या आहेत.

मात्र त्याचं मन कलाक्षेत्रात अधिक रमले. त्या शास्त्रीय संगीत विशारद असून सध्या पुणे आकाशवाणी केंद्रावर त्या निवेदिका म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमाच्या निवेदनापासून रेडिओवरच्या कार्यक्रमांची निर्मिती, लेखन, रेकॉर्डिंग, एडिटिंग, मुलाखती घेणे अशी चौफेर जबाबदारी त्या पार पाडतात.

त्याव्यतिरिक्त ललित लेखनातही त्यांना रूची आहे. त्यांचे लेख विविध मासिकांमध्ये तसेच, सकाळ, तरूण भारत या वृत्तपत्रांच्या पुरवणीतही छापून आले आहेत.