प्र. के. अत्रे
प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक आणि चित्रपट निर्माते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते एक प्रमुख नेते होते.
आचार्य अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड इथे झाला. पुणे विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर अत्रे यांनी शिक्षक म्हणून काम केले. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांनी १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला.
१९३४ साली अरुण वाचनमाला नावाने त्यांनी मराठीची क्रमिक पुस्तके लिहिली होती.
प्र. के. अत्रे यांनी कितीतरी नाटके, काव्य, विडंबनकाव्य, कथासंग्रह, कादंबरी अशी साहित्यसंपदा निर्माण केली.
त्याचे ‘टाकाने लिहिलेली गोष्ट’ ही गोष्ट ‘फुले आणि मुले’ या कथासंग्रहातून खास मुलांसाठी संक्षिप्त स्वरूपात आणली आहे.
त्याचे ‘टाकाने लिहिलेली गोष्ट’ ही गोष्ट ‘फुले आणि मुले’ या कथासंग्रहातून खास मुलांसाठी संक्षिप्त स्वरूपात आणली आहे.

