नीलिमा गुंडी

नीलिमा गुंडी

जन्मतारीख : 14 ऑक्टोबर 1952

शिक्षण : एम.ए., पी. एच. डी ., डी .एच. ई .

बी .ए .च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात सर्व विषयांमध्ये सर्वप्रथम. अनेक पुरस्कार व सुवर्णपदक. एम. ए .च्या परीक्षेतही मराठीत सर्वप्रथम आल्याबद्दल सुवर्णपदक व पुरस्कार.

त्या रामनारायण रुईया व स. प. महाविद्यालय येथे मराठीचे अध्यापन करत होत्या. 

लेखन : काव्य, बालवाङ्मय, ललित लेख, संपादन, संशोधन, समीक्षा , भाषाविषयक लेखन इत्यादी प्रकारचे साहित्य. 25 हून अधिक पुस्तके प्रकाशित.

स्त्री साहित्याचा अभ्यास करणारी पुस्तके : ‘लाटांचे मनोगत’ , ‘स्त्रीमिती’ ( संपादित ), ‘स्त्रीलिपी’ , ‘स्त्री संवेद्य’, ‘गतकाळाची गाज’ तसेच ‘भारतीय भाषांमधील स्त्री साहित्याचा साहित्याचा मागोवा’ (खंड 1 व 2 ) या ग्रंथाच्या संपादनात महत्त्वपूर्ण सहभाग .

बालसाहित्य : ‘आभाळाचा फळा’ ‘कानामात्रा’, ‘रंगांचा थवा’ , ‘दुधाचे दात’ व ‘बिच्चारा माउस’ हे बालकविता संग्रह. ‘वा-यावर स्वार’ , ‘देवमासा’, ‘अक्षरांचा देव’ हे बालकथासंग्रह.

पुरस्कार : बालकविता संग्रहांसाठी महाराष्ट्र शासनाचे दोन राज्यपुरस्कार व इतरही अनेक पुरस्कार. ‘कल्याण भूषण’ व ‘विद्याभूषण’ हे सन्मान प्राप्त. विशेष : मराठी अभ्यास परिषदेत 1997 ते 2014 या कालावधीत सक्रीय सहभाग