विजय पाडळकर
विजय पाडळकर यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९४८ रोजी बीडमध्ये झाला. वाणिज्य शाखेत विशेष प्रावीण्यासह एम. कॉम केल्यानंतर ते 1970 साली ते महाराष्ट्र बँकेत नोकरीला लागले. 2001साली पूर्णवेळ लेखन करण्यासाठी बँकेतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.
त्यांच्या लिखाणाची सुरुवात 1984 मध्ये मराठवाडा दैनिकातील अक्षर संगत सदरापासून झाली. त्यानंतर ते लिहित राहिले. गाजलेल्या साहित्यकृती आणि त्यावर निर्माण झालेले चित्रपट या विषयावर पाडळकरांचे ‘चंद्रावेगळे चांदणं’ हे पुस्तक 1995 साली प्रकाशित झाले. साहित्य आणि चित्रपट या दोन कलांचा तुलनात्मक विचार करणाऱ्या या पु्स्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला.
चित्रपटविश्वाशी निगडीत पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. गुलजार यांच्या दिग्दर्शीय कारकीर्दीचा आढावा घेणारे पुस्तक विशेष गाजले.
लाडोबा, वडोबा-आजोबा पुस्तकाची कथा ‘हयाओ मियाझाकी’ या जपानी दिग्दर्शकाच्या ‘My neighbour Toronto’ या जपानी सिनेमावर आधारित आहे. तरीही ती एक स्वतंत्र कथा आहे. जी मुलांना नक्कीच आवडेल.

