मिताली पर्किन्स
मिताली या भारतीय – अमेरिकन लेखिका आहे, त्या लहानांसाठी तसेच मोठ्यांसाठीही लिहितात. त्या भारतात जन्माला आल्या परंतु सातव्या वर्षी त्या अमेरिकेत गेल्या. लहान वयात त्यांनी भारत, घाना, कॅमेरून, लंडन, न्यू यॉर्क आणि मेक्सिको अशा देशांमध्ये निवास केला आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रातील पदवी घेतली तर सार्वजनिक धोरण विषयांत त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली.
त्या पेशाने शिक्षक होत्या. त्यांनी कॅलिफोर्नियाच्या सेंट मेरी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. त्यांच्या ‘रिक्षा गर्ल’ या पुस्तकावर 2021 मध्ये चित्रपटही निघाला आहे.

