माधुरी तळवलकर

माधुरी तळवलकर

प्रकाशित पुस्तके

१. ‘कळत जाते तसे…’ – कथासंग्रह

२. ‘कॉलसेंटर डॉट कॉम’ – कादंबरी, राज्य पुरस्कार व मृत्युंजय पुरस्कार.

३. ‘ज्याचं त्याचं आभाळ’ – कादंबरी.

‘कैद’ नावाच्या कथेस गंगाधर गाडगीळ कथा पुरस्कार. ही कथा मिळून सार्‍याजणी मासिकाकडून ‘सार्‍याजणीच्या कथा’ या पुस्तकासाठी निवडली गेली आहे.

४. ‘व्यक्तिमत्त्व फुलताना…’ – मॅनेजमेन्ट स्किल्सवरील पुस्तक. अनेक आवृत्त्या.

५. ‘तळ्याचे गुपित’ – किशोरवयीन मुलांसाठी कादंबरी.

पुस्तक-परीक्षण. जागतिकीकरणानंतरच्या कथा, गाडगीळांच्या कथानायिका… असे अभ्यासपूर्ण साहित्यविषयक लेख प्रकाशित झाले आहेत.

टेल्को, पुणे; इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, पुणे; सकाळ पेपर्स लि., पुणे या ठिकाणी काही वर्षे नोकरी. स्त्री-वृत्त नावाच्या मासिकाचे साहाय्यक संपादक म्हणून वर्षभर काम पाहिले.

पुस्तकांचे संपादन, संस्करण, शब्दांकन, अनुवाद अशी कामे आजही करीत असतात.

आगामी पुस्तके

‘ललितरंग’ (लेखसंग्रह) – आस्वादात्मक समीक्षा

‘काळंपांढरं’ – (तीन दीर्घकथा)

माधुरी तळवलकर, इ-६अ गंगातीर्थ, अरण्येश्‍वर देवळाजवळ, सहकारनगर, पुणे ४११००९.

फोन : (०२०)२४२२१५८१, मोबाइल : ९५५२५८३०८७, इमेल : panchami6300@gmail.com