कृष्णकुमार
प्रा. कृष्णकुमार भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत आहेत. समाजशास्त्र आणि इतिहास या विषयांवरील लेखनासाठी ते ओळखले जातात.
त्यांचा जन्म 1951 साली अलाहाबाद इथे झाला. त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर टोरंटो विद्यापीठातून पुढील उच्च शिक्षण घेतले आणि पीएचडी देखील मिळवली.
2004-2010 या कालावधीत ते राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटीचे संचालक म्हणून कार्यरत होते. तिथे क्रमिक पाठ्यपुस्तकांची दर्जेदार निर्मिती केली.
त्यांनी प्रारंभिक साक्षरता या मुद्द्याकडे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांची निर्मितीही केली आहे.
वाचनाच्या विविध कंगोऱ्यांचा विचार करताना प्रामुख्याने वाचन सवय आणि न समजता केले जाणारे वाचन यांची चर्चा कृष्ण कुमार यांनी वाचन विचार या पुस्तकात मांडली आहे.


