कॅरेन लिवाईन
कॅरेन लिवाईन यांचा जन्म 1955 मध्ये झाला. त्या कॅनेडियन आकाशवाणी निर्माता आणि लेखिका आहेत. आकाशवाणीवरील लघु ध्वनिपटांनी दोन पीबॉडी पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांना 2024 मध्ये ऑर्डर ऑफ कॅनडाच्या सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले होते.
कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी त्या गेली तीस वर्षे कॅरन काम करत आहेत. त्यासाठी तयार केलेल्या हॅनाज् सुटकेस या लघु ध्वनिपटासाठी त्यांना न्यू यॉर्क आंतरराष्ट्रीय रेडिओ महोत्सवात सुवर्ण पदक मिळाले होते.
2002 मध्ये त्यांनी याच लघुपटावर आधारित ‘हॅनाज् सुटकेस- अ ट्रू स्टोरी’ हे पुस्तक प्रकाशित केले. आंतराष्ट्रीय ख्यातीचे उत्तम विक्री होत असलेल्या या पुस्तकाला सिडने टेलर बुक अवार्डने गौरवण्यात आले आहे. या पुस्तकाचे जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. मराठीतही त्याचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.

