होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र
मुंबईस्थित टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेचे एक राष्ट्रीय केंद्र आहे. गणित आणि विज्ञान शिक्षणात समता आणि उत्कृष्टता यांना प्रोत्साहन देणे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देणे हे केंद्राचे ध्येय आहे.
केंद्र गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच खगोल विज्ञान या विषयांसाठी ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात देशात अग्रेसर आहे.


