हमीद उमर दलवाई

जन्म : २९ सप्टेंबर १९३२ कोकणातील मिरजोळी येथे.

मृत्यू : ३ मे १९७७

शिक्षण : निम्न मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबातले संस्कार असलेल्या दलवाईंचा शाळेत असल्यापासून राष्ट्र सेवा दलाकडे ओढा होता. राम मनोहर लोहिया हे दलवाईंचे राजकीय गुरू. मुंबईत आल्यावर त्यांनी मुस्लीम समाज व संस्कृती याबाबतचा अभ्यास सुरू केला व त्यासाठी भारतभर भ्रमण केले. १९७० साली त्यांनी मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना केली व मुस्लीम कायद्यात / शरियत / मध्ये बदल व्हावा यासाठी चळवळ सुरू केली.

लेखनप्रकार : कथासंग्रह : लाट

कादंबरी : इंधन ही दलवाईंची वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती.

इतर साहित्य : भारतातील मुस्लीम राजकारण, मुस्लीम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान; मुस्लीम जातीयतेचे स्वरूप / कारणे आणि उपाय, इस्लामचे भारतीय चित्र

लेखनविशेष : खेड्यात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, रूढी, समजुती यांचे अस्वस्थ करणारे चित्रण त्यांच्या कथांतून येते. बुद्धिवादी भूमिकेतून आणि धैर्याने स्वतःच्या समाजाकडे पाहाणारा लेखक असे दलवाईंसंबंधी म्हणता येईल.

पुरस्कार : महाराष्ट्र फाऊंडेशनचा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार २०१६ प्रा.शमसुद्दीन तांबोळी यांनी ‘हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत’ हे चरित्र लिहिले आहे. ‘हमीद : द अनसंग ह्युमनिस्ट’ हा त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा लघुपट.