गोपाळ नीलकंठ दांडेकर

जन्म : ८ जुलै १९१६

मृत्यू : १ जून १९९८ पुणे येथे.

चौथीपर्यंत शिक्षण झाल्यावर घरातून पलायन केल्यावर गोपाल जोशी या नावाने गाडगेबाबांची भेट झाल्यानंतर त्यांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगावी कीर्तने केली. वेदांताचा अभ्यास केला. २४व्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली. ५० वर्षे दुर्गभ्रमण करून मार्गदर्शन केले. लेखन / कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, पौराणिक, धार्मिक इत्यादी विविध साहित्यप्रकारात लेखन.

२६ कादंबर्‍या, १२ ललित, प्रवासवर्णन, प्रासंगिक पुस्तके, १० नाटके, १७ बालकिशोर पुस्तके असे विपुल लेखन.

प्रादेशिक कादंबर्‍या : शितू, पडघवली, माचीवरला बुधा, जैत रे जैत, रानभुली, वाघरू, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, पूर्णामायची लेकरं तांबडफुटी

ऐतिहासिक कादंबर्‍या : बया दार उघड, हरहर महादेव, दर्याभवानी, झुंजारमाची, हे तो श्रींची इच्छा; तुकाराम, रामदास, ज्ञानेश्‍वर या संतांच्या जीवनावर आधारित कादंबरीलेखन.

आत्मकथन : कुणा एकाची भ्रमणगाथा

पुरस्कार : महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार १९९० व अन्य पुरस्कार

स्फुटलेखन : छंद माझे वेगळे, दुर्गदर्शन, दुर्गभ्रमणगाथा, मावळतीचे गहिरे रंग इत्यादी