अ. म. भिडे

अनंत महादेव भिडे यांचा जन्म सांगली येथे ३१ डिसेंबर १९३४ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण सांगली हायस्कूल येथे झाले. तर पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी विशेष गुणवत्तेसह जी. डी आर्ट ही पदवी प्राप्त केली. 

ते व्यवसायाने चित्रकार तर पेशाने कलाध्यापक होते. पेरूगेट भावे हायस्कूल येथे ३८ वर्षे त्यांनी कला शिक्षक म्हणून काम केले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी १९८५मध्ये अनंत रंग आर्ट फाउंडेशनची स्थापना केली होती. त्यांनी २८ वर्षांहून अधिक काळ हस्ताक्षर सुधारणा चळवळ चालवली होती. विविध कला स्पर्धांचे ते आयोजन करत असत. 

२४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.