जी. ए. कुलकर्णी

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी म्हणजेच जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव इथे झाला. तिथेच शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण झाले. १९४६ पासून ते निरनिराळ्या महाविद्यालयात अध्यापन करत. १९५०पासून धारवाडच्या जनता महाविद्यालयात इंग्रजी प्राध्यापक म्हणून रूजू झाले. 
निळासावळा हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यांच्या ३१ कथा सत्यकथा या मासिकातही प्रसिद्ध झाल्या होत्या. निळासावळा व रक्तचंदन या कथा संग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले.
पेरू ही कथा ओंजळधारा या कथासंग्रहातील संपादित कथा आहे.