अंबरीश मिश्र

अंबरीश मिश्र

मिश्र यांचा जन्म आणि शिक्षण दोन्ही मुंबईत झाले. त्यांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रातून उमेदवारी करत कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते वृत्तपत्रसृष्टीत स्थिरावले.
क्लॅरिटी, द डेली, संडे ऑबझर्व्हर या वृत्तपत्रांमध्ये बातमीदारी केल्यानंतर गेली सत्तावीस वर्ष द टाइम्स ऑफ इंडियाच्या मुबंई आवृत्तीत कार्यरत आहेत.
त्याशिवाय, मौज, माणूस, सत्यकथा, अक्षर, दीपावली आदी दिवाळी अंकात ते नियमितपणे ललित लेखन करतात. त्यांचे ललित साहित्याची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय अलख हा कविता संग्रह देखील आहे.
ज्येष्ठ कवी गुलजार यांच्या उर्दू कथांचा अनुवाद त्यांनी केला आहे. तर ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजयाबाई मेहता यांच्या ‘बाई’ या ग्रंथाचं संपादन साहाय्य त्यांनी केले आहे, लहान मुलांसाठी निवडक बालकवितांचा ‘आलगट्टी गालगट्टी’ हा संग्रह रसाळ सोप्या भाषेत लिहिला आहे.