विलास गोगटे

विलास गोगटे

विलास गोगटे वरिष्ठ वैज्ञानिक असून, निसर्ग, वन्यजीव वनसंवर्धनाच्या क्षेत्रात ते गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत.
निसर्ग प्रेमी असल्याने ते प्राण्यांविषयी, पर्यावरणाविषयी आपल्या लिखाणातून जनजागृती करतात. ‘माझे जंगलातील मित्र वाघ’ या पुस्तकातून ते चंपा नावाच्या वाघिणीची गोष्ट सांगतात.
त्याचबरोबर वाघाचे मूळ, कूळ, त्यांचे शरीरविज्ञान आणि भारतीय संस्कृती तसेच भारतातील वाघ संरक्षणासाठी अभयारण्यांचे महत्त्व याविषयीही सोप्या शब्दांत माहिती देतात.
मुलांना यातून वनसंवर्धन, प्राणीसंरक्षण याची गरज माहिती होऊ शकते.