शलाका देशमुख
शलाका देशमुख यांनी डॉ. मंजिरी निंबकर यांच्यासमवेत मुले शिकती करताना या पुस्तकाचे सहलेखन केले आहे.
शिक्षकाची भूमिका आज अध्यापकाऐवजी सुलभक अशी मानली जाते. मुलांच्या भाषा शिक्षणात त्यांच्या भावनिक जगाची भूमिका काय असते, मूल स्वतःहून शिकू शकेल अशा वातावरणाची निर्मिती कशी करायाची अशा अनेक बाबींचा या पुस्तकात उहापोह केला आहे.
फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५० शाळांमधील ३००हून अधिक शिक्षक या पुस्तकाचा लाभ घेऊन आपल्या शाळांमध्ये ज्ञानरचनावादाचा भक्कम पाया रचत आहेत.

