रवीन्द्रनाथ टागोर

रवीन्द्रनाथ टागोर त्यांच्या ‘गीतांजली’ काव्यसंग्रह आणि त्यामुळे मिळालेले नोबेल पारितोषिक यासाठी ओळखले जातात. मात्र कवितेव्यतिरिक्तही त्यांनी सर्वच वाङ्मयप्रकारांतून त्यांनी भरपूर लेखन केले.
रवीन्द्रनाथ स्वतः मोकळ्या वातावरणात शिकल्याने, इतर मुलांना तसेच शिकता यावे यासाठी त्यांनी ‘शांतिनिकेतन’ आश्रमशाळा सुरू केली.
मुलांसाठी विपुल प्रमाणात शिशुगीतं, कथा, नाटक असे लेखन केले आहे. टागोरांच्या गोष्टी पुस्तकांतून त्यांच्या नऊ कथा वाचायला मिळतात.