शारदा बर्वे
पुण्यात मानसशास्त्रज्ञ म्हणून तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत. अर्भकांपासून युवकांपर्यंत मानसशास्त्रीय तपासण्या, तदनुषांगिक सल्ला व समुपदेशन करण्याचा अनुभव. केईएम रुग्णालयातील टीडीएच पुनर्वसन केंद्रांत प्रामुख्याने अर्भकांसाठी कामाचा 15 वर्षांचा अनुभव. 25 वर्षे स्वतःच्या अंतरंग या बालक-पालक सल्ला केंद्राचे काम. तसेच मासूम, मानव्य या संस्थांबरोबर काम करण्याचा अनुभव आहे.
त्यांची दोन पुस्तके अगदी वेगळ्या धाटणीची आहेत.
अध्ययन अक्षमता- निरनिराळ्या कारणाने, लहान किंवा मोठ्या वयातही अभ्यासातील अक्षमता निर्माण होऊ शकते. त्यावर मात कशी करता येईल हे सांगणाऱ्या चिल्ड्रन अॅन्ड लर्निंग डिफिकल्टीज या डॉ. ओनिता नाक्रांच्या पुस्तकाचा अनुवाद आहे.
तर दुसरे
अकरा रुपयांचं फाउंटन पेन हे अमित दत्ता यांचा पुस्तकाचा अनुवाद केलेला कथासंग्रह. नवीन गोष्टी शोधत राहाण्याची उर्मी मुलांनी गमावलेली नसते, अशा अर्थाच्या कथा असलेला हा संग्रह.