शंकर बाबाजी पाटील
जन्म : ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली. हातकणंगले तालुका.
मृत्यू : १८ ऑक्टोबर १९९८
शिक्षण : कोल्हापूर येथून बी.ए.बी.टी.
व्यवसाय : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक १९५७ पासून आकाशवाणीवर अधिकारी. साक्षेपी शिक्षणतज्ज्ञ. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून काम.
लेखनप्रकार : कथा : पहिला संग्रह वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, दोन, बावरी शेंग, खुळ्याची चावडी याबरोबरच काही विनोदी कथा.
लेखनविशेष : या कथासंग्रहांनंतर पाटलांनी लिहिलेली टारफुला ही ग्रामीण भागातल्या राजकीय वातावरणाचे, सत्ताकांक्षेचे, गुंडगिरीचे चित्रण करणारी कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पाटलांचे कथाविश्व ग्रामीण परिसराशी, त्यातील माणसांशी निगडित आहे. त्यांनी एक गाव बारा भानगडी, पाहुणी, वावटळ, हळदकुंकू, पिंजरा, फरारी या गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा व संवांदांचे लेखन त्यांनी केले होते.
सन्मान : १९४५ साली नांदेड येथे भरलेल्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

