रघुनाथ वामन दिघे

रघुनाथ वामन दिघे

जन्म : २५ एप्रिल १८९६. कल्याण येथे.

मृत्यू : ४ जुलै १९८० पुणे येथे.

शिक्षण : बी.ए. एल.एल.बी.

व्यवसाय : पुणे, पनवेल येथे वकिली करून १९२७ ते १९४३ या काळात पुण्यातील फौजदारी कोर्टात वकिलीचा व्यवसाय केला. पुढे विहारी खोपोली (जि. रायगड) येथे शेतीचा व्यवसाय करण्यात ते रमले.

लेखनप्रकार : कथासंग्रह : घरकुल, लक्ष्मीपूजन

कादंबरी : कार्तिकी, गानलुब्धा मृगनयना, रानजाई, आई आहे शेतात, पड रे पाण्या, सराई, सोनकी

लेखनविशेष : शेती व्यवसायाचा त्यांच्या १९४३ नंतरच्या निर्मितीशी फार जवळचा संबंध आहे. शेती करताना त्यांनी त्यात विविध प्रयोग केले.

विशेष : प्रा. रवींद्र ठाकूर यांनी र.वा.दिघे यांच्या कादंबरीवर ‘कादंबरीकार र.वा.दिघे’ हा समीक्षा ग्रंथ लिहिला आहे.