कंचन शाईन
कंचन शाईन या नॅशनल जिओग्राफिक प्रमाणित शिक्षक आहेत आणि व्यावसायिक इन्स्ट्रक्शनल डिझाईनर आहेत. त्यांना अभ्यासक्रम आराखडा, धड्यांचे नियोजन आणि खेळगट ते बारावी पर्यंतची पाठ्यपुस्तके लिहिण्याचा 15 वर्षांचा अनुभव आहे. मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया उत्साह देते आणि त्यांना विद्यार्थ्यांसाठी गुंतवून ठेवणारे तसेच शिकण्याची मजा घेत शिकण्याचे अनुभव देणे त्यांना आवडते.
काम करत नसतात, तेव्हा त्या पुस्तक वाचनात गढलेल्या असतात किंवा छायाचित्रणामध्ये रमतात. मुलांच्या साहित्यातील जुलिआ डोनाल्डसन ही त्यांची आवडती लेखिका आहे आणि त्यांची पहिली पुस्तक मालिका लिहण्याची प्रेरणाही तिच्याकडूनच मिळाली. कुटुंबासमवेत त्या मुंबईत राहातात आणि एका वेगाने विकसित होणाऱ्या एका शैक्षणिक आस्थापनेत त्या मुख्य अधिकारी- (पाठ्यक्रम आराखडा आणि विकास ) म्हणून कार्यरत आहेत.




