माधव सातवळेकर
जन्म 13 ऑगस्ट 1915
मृत्यू 2006
चित्रकार माधव सातवळेकर यांचा जन्म लाहोर येथे झाला. भारतीय चित्रकला क्षेत्रामध्ये सातवळेकर यांच्याकडे एक महत्त्वाचं चित्रकार म्हणून पाहिलं जातं.
सातवळेकरांचं चित्रकलेचं शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये झालं. त्यानंतर ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी युरोपातल्या फ्लॉरेन्स अकादमी (इटली), स्लेड स्कूल (लंडन) आणि ॲकेडमिक ग्रॅण्ड चेंबर्स (पॅरिस) येथे गेले. १९३५ साली त्यांनी प्रतिष्ठेचं मेयो मेडल मिळवलं.
तैलरंग आणि जलरंग यामध्ये त्यांनी केलेली पोर्ट्रेट्स आणि लॅण्डस्केप्स केली आहेत. पारंपरिक पौराणिक विषय यांवरची त्यांची चित्र गाजली. सामान्य माणूस हादेखील त्यांच्या सृजनशील कलाकृतीचा व चिंतनाचा विषय होता.
मुंबई येथील ताज हॉटेल येथे १९४५ साली सातवळेकरांचं पहिलं प्रदर्शन झालं. त्यातून त्यांनी केलेली कलासाधना रसिकांना लक्षात आली. त्यानंतर त्यांची भारता तसंच केनिया, युगांडा, युरोप, मध्य पूर्वेकडचे देश इत्यादी ठिकाणी तीसपेक्षा अधिक प्रदर्शनं झाली.
महराष्ट्र राज्याच्या कलासंचनालयाच्या संचालकपद सातवळेकर यांनी भूषवलं आहे. तसंच इंडिया आर्ट इन्स्टिट्यूट यांच्या संस्थापकांपैकी ते एक होते. चित्रकलेबाबत लोकांमध्ये प्रचार व जागरुकता व्हावी या उद्देशाने त्यांनी लेख लिहिले. यासाठी त्यांनी अनेक खासगी तसंच सार्वजनिक संस्थांमधून भाषणंदेखील दिली आहेत.

