प्रताप मुळीक
चांगलं व्यक्तिचित्रण करणार्या महत्त्वाच्या चित्रकारांमध्ये प्रताप मुळीक यांचा समावेश होतो. वास्तववादी शैलीतली त्यांची अनेक चित्रं देशोदेशींच्या चित्ररसिकांनी आणि कलासंस्थांनी अत्यंत अभिमानाने स्वतःच्या संग्रहात बाळगलेली आहेत.
कथाचित्रं आणि चित्रकथा यांमध्ये त्यांनी देशात व परदेशातही मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. भारतीय भाषांमध्ये चित्रकथा लोकप्रिय करण्यात तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

