शिवाजी तुपे
जन्म 1935
मृत्यू 8 ऑगस्ट 2013
कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबात शिवाजी तुपे यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती व घरातच त्यांच्यावर चित्रकलेचे संस्कार झाले. १९५७ मध्ये त्यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचं औपचारिक शिक्षण घेतलं. जलरंगातील लॅण्डस्केप्स आणि स्केचेस हे त्यांचे वैशिष्ट्य असून गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ ते लॅण्डस्केप्स करत आहेत. लॅण्डस्केप्ससाठी वेगवेगळे विषय शोधायला त्यांनी भारतभर भ्रमंती केली आहे.
चित्रनिमिर्तीसाठी त्यांनी जलरंगाशिवाय ओपेक, ऑइल, ॲक्रॅलिक अशा माध्यमांचाही वापर केला आहे. तसंच पेन आणि शाई या मध्यमातही त्यांनी मुक्तपणे काम केलं आहे. परंपरा आणि नवता या दोन्ही गोष्टींचा संगम त्यांच्या निर्मितीत दिसतो.
तुपे यांची स्वतःची तीसपेक्षा अधिक प्रदर्शनं झाली असून बॉम्बे आर्ट सोसायटी, महाराष्ट्र स्टेट आर्ट एक्झिबिशन, ललित कला अकादमी यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शानांमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे. नाशिक कला निकेतनच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.