माझे जंगलातील मित्र : वाघ

माझे जंगलातील मित्र : वाघ

विलास गोगटे

About the book

ईबुकसाठी इथे क्लिक करा. 

वयोगट १० +

जंगलांच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे काम करणारे या क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ विलास गोगटे यांच्या 'माझे जंगलातील मित्र' या मालिकेतील पहिले पुस्तक.

प्राचीन काळापासून भारताची भूमी नैसर्गिक संपत्तीने समृद्ध होती. या समृद्ध वनांचा राजा वाघ इथे सुखाने राहत होता. इंग्रजांच्या आगमनानंतर मात्र वाघांच्या शिकारीला सुरुवात झाली. नंतर माणसाने स्वार्थापोटी जंगले ओरबाडायलाही सुरुवात केली आणि वाघांची संख्या लक्षणीय घटली.

निसर्गाचा समतोल टिकवणाऱ्या वाघाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी आज वाघ आणि जंगल दोन्ही समजून घेण्याची गरज आहे.

या पुस्तकात चंपा वाघिणीची गोष्ट आणि त्याचबरोबर वाघाची उत्पत्ती, प्रजाती, त्याची शरीररचना, वाघ आणि भारतीय संस्कृती, भारतातील महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प अशी सगळी माहिती देण्यात आली आहे.