निवडक पालकनीती भाग 1 व 2

निवडक पालकनीती भाग 1 व 2

  • संपादन: पालकनीती परिवार
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती 2023
  • पाने: भाग 1 पाने 198 + भाग 2 पाने 196
  • आकार: 7.25" x 9.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 750
    INR 550

About the book

मुखपृष्ठ व मांडणी : रमाकांत धनोकर 

पालक म्हणून जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या की जे असंख्य प्रश्न पडू लागतात, त्यांचा सखोल विचार करण्यासाठी १९८७मध्ये पालकनीती मासिक सुरू करण्यात आलं. ते अव्याहतपणे आजही चालू आहे. त्यातील १९८७ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक लेखांचं हे दोन भागात केलेलं संकलन.

काळ झपाट्यानं बदलतो आहे. त्यामुळे मुलांच्या वाढीतला आपला सहभाग बदलत्या रूपात असावा लागेल. मुलांनी  अधिकाधिक सजग व्यक्ती व्हावं आणि समाज अधिकाधिक भद्र आणि मानवी व्हावा यासाठीचे प्रयत्न पालक म्हणून आपण करायला हवेत. या प्रयत्नांची दिशा ठरवताना पालकनीती आपल्या साथीला आहे.

या दोन भागांतील विषयानुरूप विभाग : पालकत्व, बालविकास, भाषामाध्यम, लैंगिकता, शिक्षणविचार, कलाशिक्षण, अनुभव, जीवनविचार 

या अंकातील मान्यवर लेखक :
संजीवनी कुलकर्णी, श्यामला वनारसे, शोभा भागवत, मकरंद साठे, यशवंत सुमंत, डॉ. रझिया पटेल, डॉ. मंजिरी निंबकर, वर्षा सहस्रबुद्धे, र. धो. कर्वे, कृष्ण कुमार, अरविन्द गुप्ता, विद्या बाळ, माधुरी पुरंदरे, नंदा खरे, विनय कुलकर्णी आणि इतर...