यश - मुखवटे

यश - मुखवटे

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 978-81-7925-209-3
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २००९, सहावे पुनर्मुद्रण २०१९
  • पाने: रंगीत 24
  • आकार: 6.6'' x 6.6''
  • कव्हर: पेपरबॅक
  • विषयानुरुप मालिका: यश
  • INR 40

About the book

वयोगट ४ +

एका प्रसिद्ध लेखकाने सांगितलं आहे की, माझ्या गोष्टी मुलांसाठी नाहीतच, त्या सर्वांसाठी आहेत. माधुरी पुरंदरे यांची पुस्तकं अशीच सर्वांसाठी असतात. प्रत्येकाला आवडतात व वेगळी कळतात. मुलांचं भावविश्व त्या नेमकेपणाने टिपतात. त्यामुळे मुलांप्रमाणेच मोठ्यांच्या मनात दडलेल्या लहान मुलालाही ती भुरळ घालतात.

पालकांनी मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवावीत आणि स्वतःही त्यात रममाण व्हावं. या पुस्तकांची भाषाशैली तसंच चित्रशैलीही सहज व सोपी आहे. माधुरीताईंची चित्रंही पुन्हा पुन्हा पाहावी अशी असतात. चित्रं पाहताना मुलांशी वेगळा संवाद होऊ शकतो. त्यातून मुलांची शब्दसंपत्ती वाढू शकते. यशच्या संचात लहान मुलांच्या मनात काय चालतं याचा विचार प्रामुख्याने केला आहे. म्हणूनच या गोष्टी लहान मुलांना आपल्याशा वाटतात.

एकदा यशशी खेळायला कोणीच नसतं म्हणून त्याला कंटाळा येतो. मग तो, त्याची आई व बाबा घर आवरण्याचा उद्योग करतात. यश उशांना अभ्रे घालतो, गादीवर बाबाच्या मदतीने चादर घालतो. इतकंच नाही तर तो घरात आलेल्या कपडे धुणार्‍या काकूंनाही कपडे धुवायला मदत करतो. साध्या साध्या प्रसंगांमधून यश त्याच्याही नकळत अशा अनेक गोष्टी शिकत असतो. एकदा यशचा हात मोडतो आणि प्लॅस्टर घातल्याने सगळे जण त्याचे लाड करतात. ते त्याला आवडतं व त्याला प्लॅस्टर अजून थोडे दिवस ठेवावं असं वाटू लागतं...

लहान मुलाच्या जीवनात घडणारे व पुन्हा पुन्हा अनुभवावे असे अनेक प्रसंग यशच्या या सहा पुस्तकांत येतात.