राधाचं घर (सहा रंगीत पुस्तकांचा संच)

राधाचं घर (सहा रंगीत पुस्तकांचा संच)

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 978-81-7925-422-6
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती, पुनर्मुद्रण २०१७
  • पाने: २४ X ६ = १४४
  • आकार: १६ सेंमी X १६ सेंमी
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 250

About the book

वयोगट ३+

ह्या घरात राधा तर राहतेच; पण राधाचे आई-बाबा, झालंच तर नाना, आजी आणि काका एवढे सगळे राहतात. शिवाय राधाचा भावसभाऊ गौतम आणि मामेभाऊ तन्मयसुद्धा. म्हणजे ते इथे राहत नसले, तरी नेहमी राधाशी खेळायला येतात, म्हणून तेही ह्या घरातलेच आहेत.

 अशा ह्या घराच्या इवल्या इवल्या गोष्टी.

(राधाचं घर' या संचातील 'आई' या पुस्तकावर आधारित ध्वनिचित्रफीत पाहण्यासाठी क्लिक करा.)

Radha Aai Mar     Radha Baba Mar     Radha Kaka Mar

Radha Aaji Mar     Radha Nana Mar     Radha Bhau Mar

आई - कधी कधी कुणी विचारतं, ‘‘राधेतू कुणाचीआईचीकी बाबाचीकी आजीची?...’’ राधा म्हणते, ‘‘मी सगळ्यांचीपण आई फक्त माझी!!’’

बाबा - राधाचा बाबा दिवसभर घरात नसतो. पण घरी आलाकी राधाशिवाय त्याला मिनिटभरही करमत नाही.

काका - काका म्हणजे वाराच. सारखं इकडून भुर्रर्रतिकडून भुर्रर्र! तो आपल्यापेक्षा मोठा आहे असं राधाला वाटतच नाही.

आजी - ‘‘मी तुझ्याएवढी होते नंराधे ऽ...’’ आजी असं म्हणते तेव्हा राधा दोन्ही कान टवकारून अन् डोळे मोठ्ठे करून छोट्या आजीच्या गोष्टी ऐकते.

नाना - राधाचे आजोबा काही रोज कामाला जात नाहीत. घरातच असतात. त्यामुळे त्यांच्यापाशी राधासाठी केव्हाही आणि कितीही वेळ असतो.

भाऊ - राधाला सख्खं भावंड नाही. पण म्हणून काय झालं! तिचे शनिवार-रविवारचे भाऊ आहेत ना - गौतम आणि तन्मय!