पाणकळा (र.वा.दिघे)

पाणकळा (र.वा.दिघे)

संक्षिप्तीकरण : माधुरी तळवलकर
  • ISBN: 978-81-7925-573-5
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 92
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 100
    INR 80

About the book

ग्रामीण साहित्य लेखक म्हणून 1940च्या दशकात र.वा.दिघे मान्यता पावले ते पाणकळा या कादंबरीमुळे. प्रादेशिकतेचे वैशिष्ट्य या कादंबरीला लाभले आहे. पाणकळा म्हणजे पाऊस. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे सारे भवितव्य या पावसार अवलंबून असते. या कादंबरीतील निसर्गवर्णने वाचताना वाचकाला निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते उलगडत जाते.

पाणकळा कादंबरीमध्ये सजलपूर गावातील गावकऱ्यांची आणि तिथल्या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या भिल्लांची कथा चितारली आहे. वारकरी भुजबा हा अतिश सरळमार्गी शेतकरी, संतमाणूस. त्याचे कुटुंब या कादंबरीत चित्रित केले आहे. गहिनाजी, आनंदराव यांना आपल्या प्रेमळ वागणुकीने तो जोडून घेतो. आनंदराव मुंबईचा रहिवासी पण ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे जीवन सुधारले पाहिजे ह्या जाणिवेखातर मुंबई सोडून सजलपूरला राहाला येतो. शेतीविषक नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांची शेती सुधारण्यास मदत करतो. ग्रामस्थांच्या अडीअडचणीलाही मदत करतो.

गावावर आपलीच सत्ता हवी अशा गुर्मीत असलेल्या आडदांड रंभाजीच्या दुराचरणामुळे गावकरी हैराण होतात. जीवाला जीव देणाऱ्या, त्याला मदत करणाऱ्या धाडसी भिल्लांचा तो फक्त आपल्या फाद्यासाठी उपयोग करून घेतो. या भिल्लांचे जीवन या कादंबरीत जवळून पहाला मिळते. रंभाजीचा बेछूट आणि रंगेल मुलगा राया आणि भुजबाची मुलगी सोनी यांची उत्कट प्रेमकथा पाणकळामध्ये लेखकाने रंगवली आहे. सजलपूरचे गावकरी, त्यांचे हेवेदावे, त्यांची सुखदुःखं लेखकाने या कादंबरीत चितारली आहेत. या कादंबरीतील सगळ्याव्यक्तिरेखा र.वा.दिघे ह्यांनी समर्थपणे उभ्या केल्या आहेत. प्रातिनिधिक अशा ह्या ग्रामीण कादंबरीतील निसर्गवर्णने वाचताना वाचकाला निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते उलगडत जाते.