माझ्या आवडत्या गोष्टी

माझ्या आवडत्या गोष्टी

  • चित्रकार: संजय पांडे
  • ISBN: 978-81-7925-316-8
  • आवृत्ती: तिसरी आवृत्ती
  • पाने: 96
  • आकार: 7" x 9.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 75

About the book

ईबुकसाठी इथे क्लिक करा.

वयोगट १० +

काळ, देश, धर्म यांच्यापलीकडे जाऊन पिढ्यान्‌पिढ्या परंपरेने चालत आलेल्या, आजही टिकून असलेल्या आणि तेवढ्याच आवडीने ऐकल्या आणि वाचल्या जाणार्‍या देशविदेशांमधल्या आणि भारतामधल्या गोष्टी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

`लीची' ही चिनी कथा, `प्रार्थना' ही रशियन कथा, `जगणं' ही इजिप्शियन गोष्ट, मोरोक्को देशातली `एका नदीची गोष्ट', हिमालयाच्या कुशीतली `दावाची गोष्ट' अशा निरनिराळ्या ठिकाणच्या गोष्टींबरोबरच `गाडगेबाबा' यांच्यापासून आधुनिक संतांपर्यंतच्या गोष्टीही राजा मंगळवेढेकरांनी खास आपल्या शैलीत सांगितल्या आहेत.

`जे चांगलं असतं, ते टिकतं' या उक्तीचा प्रत्यय देणार्‍या या निवडक गोष्टी आजही चवीने ऐकल्या आणि वाचल्या जातात.