लालू बोक्याच्या गोष्टी

लालू बोक्याच्या गोष्टी

  • चित्रकार: माधुरी पुरंदरे
  • ISBN: 978-81-7925-190-4
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, चौथे पुर्नमुद्रण २०२०
  • पाने: 32
  • आकार: 9.5'' X 6.25''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • INR 80

About the book

वयोगट ७ +

निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ घालायची. अशा रीतीनं खाऊनखाऊन लालू बोका चांगला गलेलठ्ठ झाला होता. खायचं न् झोपायचं. खाण्यासाठी उठायचं न् खाऊन पुन्हा झोपायचं. असा त्याचा कार्यक्रम होता. अशा या लालूच्या तीन गोष्टी.