गोल गोल

गोल गोल

मंदाकिनी गोडसे
  • चित्रकार: राजू देशपांडे
  • ISBN: 978-81-7925-149-2
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, दुसरे पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: 24
  • आकार: 5.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 25

About the book

मंदाकिनी गोडसे यांच्या मुलांना आवडतील अशा कविता. सोबत राजू देशपांडे यांची अप्रतिम चित्रे.

या कविता सोप्या सहजसुंदर आहेत.

बोका -

कोण्या एका गावामध्ये

एक होता बोका-

घरोघरच्या दह्यादुधाला

रात्रंदिवस धोका!

लांबच लांब मिशा आणि

कवड्यासारखे डोळे

अंधारात चमकले की

घाबरायचे सारे!

बोकोबाचं अंग होतं

गोरं गोरं पिठ्ठ

हवं तेवढं खाऊन पिऊन

झाला होतं लठ्ठ!