बिचारा माउस

बिचारा माउस

  • चित्रकार: राहुल देशपांडे
  • ISBN: 978-81-7925-469-1
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 24
  • आकार: 5.5" X 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • Chidren's Literature
  • INR 20

About the book

नव्या युगातील मुलांच्या कविता.

 

बिचारा माउस

मूषकावरून येता  गणपतीची स्वारी

 संगणकापुढचा ‘माउस’  आदळआपट करी!

 

 तो तर म्हणे, ‘मूषक!’  मी बिच्चारा ‘माउस!’

 त्याला पूजा-आरती  मला नाही का हौस?

 

 रोज रोज सारे जण  जमती त्याच्याभोवती

 बाप्पाबरोबर त्याचे  अगदी दर्शन घेती!

 

कौतुकाची थाप साधी  नाही मिळत मला!

 माझ्यावरती सारखा  टिचक्यांचाच मारा!

 

 बाप्पा म्हणाले, ‘‘अरे,  तू चिडतो कशासाठी?

 दोघेही ‘उंदीरमामा’च  शेवटी मुलांसाठी!’’