लोककथा संच

लोककथा संच

  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 260
    INR 234

About the book

वयोगट ७+

विविध राज्यांतील लोककथांचा संच.

१. एक्की दोक्की

एक्की आणि दोक्की या दोघी बहिणी होत्या. एक्कीच्या डोक्यावर एक केस होता म्हणून तिला एक्की म्हणत. तर दोक्कीच्या डोक्यावर दोन केस होते म्हणून तिला दोक्की म्हणत. तिला आपल्या दोन केसांचा फार अभिमान होता. दोक्की नेहमी एक्कीला चिडवायची. एक दिवस एक्की बहिणीवर वैतागून घर सोडून निघून गेली. जंगलात तिला एक म्हातारी भेटली आणि...

 

२. जादूची भांडी 

जादूची भांडी ही तामिळनाडूमधली लोककथा आहे. मुथू हा झाडाखाली राहणारा एक गरीब नाटककार, कामाच्या शोधात जंगलातून जाताना अचानक एक चमत्कार घडतो आणि त्याचे दिवस पालटतात... यातली चित्रं मुलांना तसंच मोठ्यांनाही आवडतील अशी आहेत.

 

३. वाकडे शेपूट

ही बिहारी लोककथा आहे. यात कालिया चांभार सुंदर जोडे बनवतो पण तो गरीब असतो. एक भूत त्याला श्रीमंत व्हायला मदत करतं. अट एवढीच की त्या भुताला सारखं कामात गुंतवायचं नाहीतर ते कालियाला खाऊन टाकेल... यातली चित्रं लोकप्रिय मधुबनी शैलीवर आधारलेली आहेत. उत्तर बिहारमधल्या स्त्रिया अशी चित्रं काढतात. या शैलीचा सुंदर वापर या पुस्तकात केला आहे.

 

४. ईचा पूचा 

एके दिवशी ईचा नावाची माशी आणि पूचा नावाच्या मांजरीने मिळून तांदळाची चविष्ट कणेरी बनवली. पण कणेरी खायची कशी? त्यांच्याजवळ काही चमचा नव्हता. म्हणून फणसाचं पान शोधायला ईचा भुरकन उडाली. पूचाने कणेरीवर लक्ष ठेवायचं कबूल केलं. तिला फार भूक लागली होती. तिने थोडा वेळ वाट पाहिली. तिला राहवेना. तिने कणेरी खाऊन संपवली. पण तिचं पोट फुगायला लागलं...