
चोरी
मधु मंगेश कर्णिक
- संपादन: माधुरी पुरंदरे
- ISBN: 978-93-93381-02-6
- आवृत्ती: पहिली आवृत्ती
- पाने: 16
- आकार: 7.25 " x 9.5 "
- कव्हर: पेपरबॅक
-
INR 65
About the book
मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात.
गोपू चालत चालत खूप लांबवर आला. तेथे अद्याप न कापलेले एक शेत उभे होते. भाताच्या ओंब्यानी गच्च भरलेले, वाऱ्यावर डुलणारे आणि त्यावर पोपटांचे थवे भरारत होते. लांब शेपट्यांचे हिरवेगार पोपट पलीकडच्या झाडीतून बाणासारखे धावत येत आणि त्या शेताला भिडत. चोचीत एकेक ओंबी पकडून पुन्हा माघारी जात.