चिमण गीते

चिमण गीते

  • पाने: 24
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

वयोगट ३ +

बेडूकराव -

बेडूक एकदा शाळेत गेला

गंपूच्या शेजारी गुपचूप बसला

बघितले गंपूने बावळट ध्यान

खिशात टाकले पकडून कान

बेडूक ओरडला डराव डराव

चिंटूने सांगितले गंपूचे नाव

धावले मास्तर घेऊन छडी

बेडकाने मारली टुणकन उडी

घाबरले मास्तर बेडूक पळाला

गंपूला छडीचा प्रसाद मिळाला.