
कुमारस्वर एक गंधर्व कथा
About the book
वयाच्या सातव्या वर्षापासून पुढची साठ वर्षं
रसिकांना शास्त्रीय संगीत ‘सांगण्या'साठी धडपडणारा
एक कर्तबगार आणि प्रतिभावंत गायक कुमार गंधर्व यांची
कुमारवयीन वाचकांसाठी लिहिलेली
आणि मोठ्यांनाही वाचायला आवडेल अशी चरित्रकथा :
‘कुमारस्वर एक गंधर्व कथा’
चित्रकला, संगीत, साहित्य अशा विविध कलांची उत्तम जाण असणाऱ्या प्रसिद्ध
लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या लेखणीतून
आणि नामवंत चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या कुंचल्यातून साकारलेली;
वाचावी आणि पाहत राहावी अशी अजोड कलाकृती!