अदान अँड ईव्हा

अदान अँड ईव्हा

  • ISBN: 9788184980752
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती (मेहता पब्लिशिंग हाउस)
  • पाने: 72
  • आकार: 5.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 80

About the book

अयन हिसरी अली आणि अॅना ग्रे लिखित या गोष्टीत अदान आणि ईव्हा या किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचे सुंदर वर्णन केले आहे.

पूर्णपणे भिन्न धर्म, संस्कृती आणि सामाजिक परिस्थिती असलेली दोन कोवळी मुले योगायोगाने एकत्र येतात आणि दोघांच्याही एकाकी जीवनात एक अनोखे मैत्र निर्माण होते. या घटनांचा दोन्ही समाजातील शहाण्यासुरत्या माणसांनी लावलेला अर्थ आणि त्यावरील त्यांची प्रतिक्रिया यातून वर्तमानातील काही सत्य प्रसंगांची आठवण होते आणि परिस्थितीचा कसा विपर्यास होऊ शकतो याची प्रचिती येते. पुढे ठाकलेल्या प्रसंगाची कल्पना असूनह़ी आपला आशावाद हरपू न देता ही दोन निरागस मुले जी स्वप्ने रंगवतात त्यावर फक्त `तथास्तु` एवढेच म्हणावेसे वाटते.