
रंगलेपन तंत्र व मंत्र
About the book
सध्या अनेकांकडे क्रेयॉन, पेस्टल, कलर पेन्सिल, वॉटरकलर, पोस्टर कलर असे विविध प्रकारचे रंग असतात. या प्रत्येक रंगाचे काही गुणदोष व स्वतःची अशी वैशिष्ट्यं असतात. या पुस्तकात वझे यांनी या प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्यं, हाताळण्याची पद्धत, दोन माध्यमांतला फरक, वेळप्रसंगी ती एकत्रितरीत्या कशी वापरायची अशी सारी माहिती अनेक उदाहरणांच्या साहाय्याने दिली आहे.
वझे यांनी ही माहिती सांगताना वेळोवेळी केलेल्या सूचना, चित्रासोबत येणारं त्यांचं मनोगत यामुळे कलात्मक जाणीव विकसित व्हायलाही मदत होईल.