स्वाती राजे

स्वाती राजे

पुण्यात वास्तव्यास असलेल्या लेखिका स्वाती राजे यांचे लिखाण लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही भावते. पत्रकार म्हणून काम केलेल्या स्वाती राजे यांना प्रवासाची आवड आहे. त्यांच्याकडे असलेल्या विविध अनुभवांच्या खजिन्यामुळे त्यांच्याकडे मुलांना सांगण्याजोगे खूप काही असते. मुलांसाठी लिहिणे ही त्यांची आवड असून त्यांनी बालसाहित्यात एम.ए. व एम.फिल केले आहे.

स्वाती राजे या 'भाषा' फाउंडेशनच्या फाउंडर प्रेसिडेंट आहेत. भाषा ही बालसाहित्यात तसेच प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी काम करणारी ना नफा तत्वावर चालणारी स्वयंसेवी संस्था आहे.