वासुदेव कामत

वासुदेव कामत

जन्म 1956 

लहानपणापासूनच वासुदेव कामत यांना चित्रकलेचा छंद होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि इथेच त्यांच्यातल्या चित्रकलागुणांना व्यासपीठ मिळालं. त्यांनी जीडी आर्ट प्रथम श्रेणीत डिस्टिंक्शनसह पूर्ण केलं.

कामत यांना तैलरंग आणि जलरंग यांमध्ये काम करायला आवडत असलं तरी त्यांनी सॉफ्ट पेस्टल्स, ऑइल पेस्टल्स आणि क्रॅलिक्समध्येही बरंच काम केलं आहे. चित्रकलेचं शिक्षण घेत असतानाच त्यांना लॅण्डस्केप्स आणि पोर्ट्रेट्स करायला आवडायचं. लॅन्डस्केप्स, पोर्ट्रेट्स, स्टिल लाइफ यांसारखे सगळे विषय कामत यांनी हाताळले असून त्यांना सुचलेल्या कल्पनांच्या आधारावरही त्यांनी चित्रं काढली आहेत. तसंच पौराणिक विषयांचा अभ्यास करून ते विषय वास्तववादी शैलीमध्ये चितारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. या चित्रांना ते बोधचित्र असं म्हणतात.

पोर्ट्रेट्स या विषयातली त्यांची हुकुमत वाखण्याजोगी असून त्यासाठी त्यांना अनेक सन्मान देऊन गौरवण्यात आलं आहे. 'माय वाइफ' या पोर्ट्रेटसाठी त्यांना २००६ साली मानाचा समजला जाणारा द पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचा ड्रेपर ग्रॅण्ड पुरस्कार मिळाला आहे.