रमा हर्डीकर-सखदेव

रमा हर्डीकर-सखदेव

रमाने ग्राफिक डिझायनिंगचं शिक्षण घेतलेलं असलं तरी तिला अनुवाद आणि मुलांसाठी लेखन करण्यात विशेष रस आहे. माधुरी पुरंदरे यांची पुस्तकं तिने मराठीतून इंग्रजीत अनुवादित केली असून, एडगर अलन पो आणि रस्किन बाँड या लेखकांचं साहित्यदेखील मराठीत अनुवादित केलं आहे.

पुस्तकांव्यतिरिक्त निसर्ग हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

आई झाल्यावर आपल्या मुलीच्या नजरेतून जग पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन रमाला सापडला आणि सध्या तीच तिची लिखाणाची प्रेरणा आहे.