माधुरी भिडे

माधुरी भिडे

माधुरी भिडे यांचा जन्म 7 जून 1938 साली झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून कलाशाखेत पदवी संपादन केल्यानंतर महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे येथून मास्टर ऑफ सोशल वर्क केलं. त्यानंतर चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या ज्युवेनाइल कोर्टाशी संलग्न असलेल्या बाल मार्गदर्शन केंद्रात तसेच महाराष्ट्र स्टेट वुईमेन्स कौन्सिलच्या 'सवेरा' या विशेष मुलांच्या शाळेत व बाल मार्गदर्शन केंद्रात मानसशास्त्रज्ञ समाजसेविका म्हणून अनेक वर्षं काम केलं आहे.

मुलांसोबत काम करण्याची आणि त्यांच्यासाठी लेखन करण्याची त्यांना मुळातच आवड होती. 1977 सालापासून त्यांनी लेखनास प्रारंभ केला. आजवर कथासंग्रह, कादंबर्‍या, एकांकिका, वैचारिक, प्रौढ नवसाक्षरांसाठी पुस्तकं, बालवाङ्मय. ग्रीक शोकनाट्यांची भाषांतरं अशी त्यांची 55 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

त्यांच्या लेखनाला महात्मा गांधी अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह लिटरेचर इन सोशल वर्क, महाराष्ट्र राज्य बालविकास समितीचा बालसाहित्याचा पुसस्कार, मराठी बालकुमार साहित्य संमेलनात दयार्णव पुरस्कार, नवी मुंबई महानगपालिकेतर्फे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.