पुण्डलीक वझे

पुण्डलीक वझे

प्रकाशन क्षेत्रामध्ये पुण्डलीक वझे यांचे नाव प्रसिद्ध आहे ते चित्रकार म्हणून! लहान मुलांच्या कविता, गोष्टी यांच्या अनेक पुस्तकांना त्यांनी आपल्या चित्रांनी सजवलं आहे. त्यांची सहज सोपी चित्रशैली लहान मुलांना आपलीशी वाटते.

वझे यांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून आप्लाइड आर्टचं शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठातून फाइन आर्टमध्ये पदवी संपादन केली आहे. ते लहान मुलं आणि हौशी व नवोदित चित्रकारांसाठी वर्कशॉप्स घेतात. याशिवाय लहान मुलांसाठी खेळणी तयार करण्याच्या क्षेत्रातदेखील कार्यरत आहेत. पुस्तकांची सजावट, चित्र काढणं आणि मुलांसाठी खेळणी तयार करणं यांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.