डॉ. संगीता बर्वे

डॉ. संगीता बर्वे

2017 सालचा महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार पियूची वही या कादंबरीस!

2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार पियूची वही या कादंबरीस!

डॉ. संगीता राजीव बर्वे  या B.A.M.S आहेत. तसेच त्यांनी  Masters in Ayurvedic dietetics केले आहे. त्यांनी मराठी विषयात MA ही केलेले आहे.
संगीता बर्वे यांचे, मृगतृष्णा व  दिवसाच्या वाटेवरून, अंतरीच्या गर्भी हे  कवितासंग्रह आहेत. मुलांसाठीही त्यांचे, गंमत झाली भारी, झाडआजोबा, खारुताई आणि सावलीबाई, उजेडाचा गाव, हुर्रेहूप असे अनेक कवितासंग्रह आहेत. अदितीची साहसी सफर या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. याशिवाय त्यांनी  ललित लेखनही केले आहे.
त्यांच्या कवितासंग्रहांना पुणे मराठी ग्रंथालयाचा न. चिं. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार, इंदिरा संत योजनेअंतर्गत उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार, विशाखा पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, सोलापूरचा रायते गुरुजी पुरस्कार, अनन्वय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.